Marathwada Rain Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भासह कोकणात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे.
(MINT_PRINT)परंतु जुलै महिना संपत आलेला असला तरी मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं विभागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावते आहे.
(AP)मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
(HT_PRINT)जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर आतापर्यंत केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
(AP)जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(Hindustan Times)