Maharashtra Weather Updates : पावसाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली होती. परंतु आता तापमान खालावत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे.
(HT)नागपूर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(HT)ऑक्टोबर महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर आता राज्यातील तापमान खालावलं असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.
(HT)Maharashtra Winter Update : मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडी वाढत असल्याचं चित्र आहे. विभागातील अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे.
(HT)