लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. नुकताच इलियानाने तिचा मुलगा कोया फिनिक्स डोलनचा पहिला वाढदिवस साजरा केला.
इलियानाने इन्स्टाग्रामवर आपला मुलगा कोया फिनिक्सच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने मुलाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
इलियानाने एप्रिल २०२३ मध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी तिने मुलाला जन्म दिला. आता तिने मुलाचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इलियानाने आपला मुलगा कोयाचा वाढदिवस पती मायकेल डोलनसोबत साजरा केला. या फोटोत कोया इलियानाच्या मांडीवर झोपलेला दिसत आहे.