आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक कुठे पाहता येणार? सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे वेळापत्रक cisce.org वेबसाईटवर उपलब्ध आहे. आयसीएसई बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होईल. परीक्षा इंग्रजी भाषेत असेल. २८ मार्च २०२४ रोजी परीक्षा संपणार आहे.
बारावी किंवा आयएससीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा ३ एप्रिल रोजी संपणार आहे. परीक्षा पेपर दुपारी २ वाजता सुरुवात होतील. परीक्षा ३ तास चालेल. लेखी परीक्षेत प्रश्न वाचण्यासाठी १५ मिनिटे दिली जातात.
परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी तुम्हाला आयसीएसई आणि आयएससीचा वेळापत्रक पाहण्यासाठी cisce.org वर अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. पृष्ठामध्ये परीक्षेसाठी २०२४ बोर्ड परीक्षा लिंक आहे. त्या लिंकवर जा आणि नवीन पीटीएफ फाईल मिळवा. तारीख पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. तुम्ही पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट ठेवू शकता.