मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  U19 WC : मुशीर खाननंतर सोम्य पांडेनं दाखवला दम, न्यूझीलंड ८१ धावांत गारद, भारताचा २१४ धावांनी विजय

U19 WC : मुशीर खाननंतर सोम्य पांडेनं दाखवला दम, न्यूझीलंड ८१ धावांत गारद, भारताचा २१४ धावांनी विजय

Jan 30, 2024 09:08 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • ICC U19 World Cup India vs New Zeland Highlights: अंंडर-१९ वर्ल्डकपच्या सुुपर सिक्स फेरीत भारताने न्यूझीलंडचा २१४ धावांनी पराभव केला. मुशीर खान आणि सोम्या पांडे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. मुशीरने १३१ धावांची खेळी केली तर सोम्या पांडेने ४ विकेट घेतल्या.

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सुपर सिक्सचा थरार सुरू झाला आहे. सुपर-६ सामन्यात आज (३० जानेवारी) भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताने ५० षटकात ८ २९५ धावांचा डोंगर उभारला. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

प्रत्युत्तरात न्यूझीलंडला १०० धावाही करता आल्या नाहीत. किवी संघ २८.१ षटकांत ८१ धावांवर गारद झाला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

भारताची सुरुवात खराब झाली होती. पण यानंतर आदर्श सिंगने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. आदर्श ५८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत ८७ धावांची भागीदारी केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात उदयने आपली विकेट गमावली. तो ३४ धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने भारताच्या विकेट पडत राहिल्या.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

या दरम्यान, मुशीर खानने शानदार शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ४ सामन्यांच्या ४ डावात ८१.२५ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

यापूर्वी मुशीर खानने बांगलादेशविरुद्ध ३, आयर्लंडविरुद्ध ११८ धावा आणि अमेरिकेविरुद्ध ७३ धावा केल्या होत्या. या सामन्यात तो १२६ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावा करून बाद झाला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

 न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक (१९) धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने ४ विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

 न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक (१९) धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने ४ विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

WhatsApp channel

इतर गॅलरीज