मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  BAN vs SL: बांगलादेशचा श्रीलंकेवर थरारक विजय; पाहा सामन्यातील खास फोटो

BAN vs SL: बांगलादेशचा श्रीलंकेवर थरारक विजय; पाहा सामन्यातील खास फोटो

Jun 08, 2024 07:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • ICC T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीतील १५व्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्स राखून विजय मिळवला.
बांगलादेशने २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील साखळी फेरीतील १५ व्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. सलग दोन पराभवानंतर श्रीलंकेला सुपर-८ मधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
share
(1 / 5)
बांगलादेशने २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील साखळी फेरीतील १५ व्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. सलग दोन पराभवानंतर श्रीलंकेला सुपर-८ मधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बांगलादेशने आपला पहिला सामना जिंकला. डॅलसच्या ग्रँड प्रेयरी मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय मिळवला. 'ड' गटात ते दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले.
share
(2 / 5)
बांगलादेशने आपला पहिला सामना जिंकला. डॅलसच्या ग्रँड प्रेयरी मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय मिळवला. 'ड' गटात ते दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले.(PTI)
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२४ धावा केल्या. पाथुम निसांकाने सर्वाधिक ४७ धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
share
(3 / 5)
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२४ धावा केल्या. पाथुम निसांकाने सर्वाधिक ४७ धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.(PTI)
१२५ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशलाही संघर्ष करावा लागला पण अखेर १९ षटकांत सामना जिंकला. लिटन दास (३६ धावा) आणि तौहिद हृदयी (४० धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. नुवान तुषारने 4 विकेट घेतल्या पण तो सामना जिंकू शकला नाही.
share
(4 / 5)
१२५ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशलाही संघर्ष करावा लागला पण अखेर १९ षटकांत सामना जिंकला. लिटन दास (३६ धावा) आणि तौहिद हृदयी (४० धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. नुवान तुषारने 4 विकेट घेतल्या पण तो सामना जिंकू शकला नाही.(AP)
टी-२० विश्वचषकात चांगली सुरुवात करणाऱ्या बांगलादेशचा पुढील सामना १० जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा सामना ११ जूनरोजी नेपाळशी होणार आहे.
share
(5 / 5)
टी-२० विश्वचषकात चांगली सुरुवात करणाऱ्या बांगलादेशचा पुढील सामना १० जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा सामना ११ जूनरोजी नेपाळशी होणार आहे.(PTI)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज