icc revenue distribution model : BCCI आणखी श्रीमंत होणार आहे. ICC पुढील ४ वर्षांसाठी तयार केलेल्या नवीन महसूल वितरण मॉडेल अंतर्गत, बीसीसीआय जागतिक क्रिकेटमध्ये एक पॉवरहाऊस म्हणून उदयास येईल. या काळात आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नाच्या ४० टक्के रक्कम बीसीसीआयकडे येणार आहे.
(1 / 8)
ICC ने पुढील ४ वर्षांसाठी नवीन महसूल वितरण मॉडेल तयार केले आहे. या महसूल वितरण मॉडेल अंतर्गत सर्व देशांचा हिस्साही ठरवण्यात आला आहे. ICC २०२४-२०२७ या ४ वर्षात ६० कोटी डॉलर्स (४९३२ कोटी रु.) वितरीत करेल. (CA IG)
(2 / 8)
या मॉडेलनुसार, BCCI २०२४-२०१७ दरम्यान दरवर्षी २३० मिलियन डॉलर्स (सुमारे १९०० कोटी रुपये) कमवू शकते. म्हणजेच BCCI ला ICC च्या ५००० कोटींच्या वार्षिक उत्पन्नाचा ३८.५% हिस्सा मिळणार आहे.
(3 / 8)
या मॉडेलनुसार भारतानंतर ECB हे सर्वाधिक कमाई करणारे क्रिकेट बोर्ड असणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या एकूण उत्पन्नाच्या ६.८९% पैसे कमवू शकते. (ECB IG)
(4 / 8)
यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा नंबर येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) ICCच्या वार्षिक कमाईच्या ६.२५ टक्के रक्कम मिळणार आहे.(CA IG)
(5 / 8)
यानंतर पाकिस्तानचा नंबर आहे. पाकिस्तानला आयसीसीच्या एकुण कमाईचा ५.७५ टक्के हिस्सा मिळेल. (PCB IG)
(6 / 8)
जिथे भारत वर्षभरात १९०० कोटी कमवेल. त्याच वेळी, पीसीबीची कमाई सुमारे २८४ कोटी असेल. म्हणजेच बीसीसीआयला आयसीसीच्या महसूलातून पीसीबीपेक्षा ९ पट जास्त रक्कम मिळेल.
(7 / 8)
वार्षिक उत्पन्नाचा हा आकडा ICC च्या अंदाजे कमाईवर आधारित आहे. या उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग हा भारतातील मीडिया राईट्सच्या विक्रीतून आला आहे. डिस्ने स्टारने अलीकडेच ४ वर्षांसाठी मीडिया हक्क विकत घेतले आहेत.(ECB IG)