पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ५व्या स्थानावर आहे. आफ्रिदीने ९ सामन्यांत १८ विकेट घेतल्या आहेत.
(REUTERS)टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत १० सामन्यांत १८ विकत घेतले आहेत, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.
(PTI)दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज कोएत्झीने या विश्वचषकात ८ सामन्यांत २० विकेट घेतले आहेत. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
(REUTERS)या यादीत श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका चौथ्या क्रमांकावर आहे. मधुशंकाने ९ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने या विश्वचषकात चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. झाम्पाने खेळलेल्या १० सामन्यांत ५.४७च्या इकॉनॉमीने २२ विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणा यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(AFP)टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ५७ धावांत सात विकेट घेत विश्वविक्रमी गोलंदाजी केली. २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शमी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ६ सामन्यांत ५.०१ च्या इकॉनॉमी रेटने २३ विकेट घेतल्या आहेत.
(ICC - X)