(1 / 11)इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराण सरकारने या बाबत जाहिर केले आहे. रईसी यांच्या सोबत इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तब्बल १५ जण या घटनेत ठार झाले आहेत. या अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान, रईसी यांच्या मृत्यूबाबत विविध प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांचा मृत्यूची आठवण झाली आहे, ज्यांचा विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. विमान अपघातांच्या इतिहासात आतापर्यंत १० घटना घडल्या आहेत जेव्हा एखाद्या देशाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला. या नेत्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल झिया-उल-हक. जाणून घेऊया आतापर्यंत कोणते नेते अशा अपघातांना बळी पडले आहेत.