
गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर गुन्हे करणाऱ्या 9 जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरात ७१२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सायबर गुन्हेगार मुंबई, लखनौ, गुजरात, हैदराबाद येथील आहेत. त्यांचा दुबई आणि चीनमधील सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हैदराबाद शहराचे सीपी सीव्ही आनंद म्हणाले की, गुंतवणुकीच्या नावाखाली चोरलेले सर्व पैसे दुबईहून चीनमध्ये क्रिप्टो करन्सीद्वारे जात असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

