पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम, डोंगराळ भागातील एका गावात भूस्खलन होऊन शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पापुआ न्यू गिनीच्या एंगा प्रांतातील माईप मुलिताका येथे भूस्खलनाच्या ठिकाणी लोक जमा झाले आहेत.
(AFP)ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (एबीसी) दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून वायव्येस ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एंगा प्रांतातील काओकलाम गावात पहाटे तीन च्या सुमारास भूस्खलन झाले. मृतांचा आकडा १०० च्या वर असल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला असला तरी अधिकाऱ्यांनी या आकड्याला दुजोरा दिलेला नाही. मृतांची संख्या अधिक असू शकते, असे गावकऱ्यांनी सांगितले.
(AFP)पंतप्रधान जेम्स मरापे यांनी सांगितले की, अधिकारी प्रतिसाद देत आहेत आणि ते उपलब्ध होताच नुकसान आणि जीवितहानीची माहिती जाहीर करू. "मला अद्याप परिस्थितीची पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आज पहाटे झालेल्या दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे मरापे यांनी म्हटले आहे.
(AFP)