
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता नंतर आता तिचा माजी पती मधु मंटेना दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. शनिवारी त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सामील झाले होते. अभिनेता हृतिक रोशन देखील या लग्न सोहळ्यात सामील झाला होता. यावेळी त्याने ट्रेडीशनल लूक कॅरी केला होता.
चित्रपट निर्माते मधु मंटेना आणि त्यांची होणारी पत्नी इरा त्रिवेदी यांचा मेहंदी सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते. आमिर खान, हृतिक रोशन, राजकुमार राव, पत्रलेखा आणि निखिल द्विवेदी यांच्यासह अनेक चित्रपट कलाकार मधु आणि इरा यांच्या लग्नसोहळ्यात दिसले.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन देखील मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांच्या मेहेंदी सेरेमनीला पोहोचला होता. यावेळी त्याच्या लूकवर सगळयांच्याच नजरा खिळल्या होत्या.
या फोटोंमध्ये हृतिक रोशन देसी लूकमध्ये पाहायला मिळाला. हृतिक रोशनच्या या लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत.


