
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसतो. झोया अख्तरचा चित्रपट 'द आर्चीज'चा प्रीमियर नुकताच पार पडला.
या प्रीमियर सोहळ्यात संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये अभिनेत्री सबा आझाद आणि अभिनेत्री हृतिक रोशन यांनी देखील जोडीने हजेरी लावली होती.
यावेळी हृतिक आणि सबा एकमेकांचा हात धरून फोटो पोज देताना दिसले आहेत. यावेळी सबाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री विचित्र हेअरस्टाईलमुळे ट्रोल देखील झाली होती.
हृतिक रोशन आणि सबा आझाद 'द आर्चीज'च्या प्रीमियरला उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री फ्लोरल प्रिंटेड मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉपमध्ये दिसली. यासोबत तिने हाय हिल्स घातल्या होत्या. ड्रेससोबतच सबाची हेअर स्टाइलही खूपच वेगळी होती.


