अकाली केस पांढरे होणे आणि केस गळणे ही अनेकांची मोठी समस्या आहे. विशेषत: तरुणांसाठी हे त्रासदायक आहे. पांढरे केस दूर करण्यासाठी डाय किंवा हेअर कलर लावले जातात. त्यामुळे केस अधिक पांढरे, कोरडे आणि कमकुवत होतात
अंजीर आपल्या केसांचा रंग डार्क करू शकतो आणि चांगल्या परिणामांसाठी पेस्ट म्हणून टाळूवर लावू शकतो.
अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. त्याचप्रमाणे मेथी दाणे ही पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी वरील सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये दही आणि एलोवेरा जेल मिक्स करा.
हे मिश्रण मेहंदी लावल्यासारखे टाळूवर चोळा आणि केसांची मुळे त्याच्या संपर्कात येईपर्यंत टाळूवर चोळा.