घरात राशन भरुन ठेवलेले असेल तर त्याला नेहमी मुंग्या लागतात. कधी डाळींमध्ये मुंग्या असतात तर कधी पिठामध्ये मुंग्या दिसतात. इतकच काय तर जर स्वयंपाकघरात थोडा ओलावा असेल तर मसाल्यांमध्ये ही मुंग्याचा शिरकाव पाहायला मिळतो. जर तुम्ही डाळी आणि पिठ ठेवण्याची पद्धत बदलली तर नक्कीच मुंग्यापासून सुटका मिळेल.
जर तुम्ही गव्हाचे पिठ एका डब्यात ठेवले असेल तर त्या डब्ब्यामध्ये सुकलेली लाल मिर्ची ठेवा. याने कधीही मुंग्या लागत नाहीत.
मुग डाळ किंवा मसूर डाळ ज्या डब्यात ठेवली आहे त्यामध्ये तमालपत्र टाकावे. जेणेकरुन किडे किंवा मुंग्या लागणार नाहीत.
तांदळाच्या भांड्यात कडुलिंबाचा पाला टाकून ठेवा. पाला टाकताना केवळ पाने टाकू नयेत तर देठा सहित टाकावा.