त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य वाढवण्यासाठी गुलाब जल किती फायदेशीर आहे हे अनेकांना माहीत आहे. हे तुमच्या त्वचेच्या छिद्रांना घट्ट करण्यासाठी सर्वोत्तम टोनर म्हणून देखील काम करते. परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या गुलाब जलच्या शुद्धतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. इतकेच नाही तर हे ब्युटी प्रोडक्ट खूप महागही आहेत.
(Freepik)काही मिनिटांत घरी गुलाब जल कसे बनवायचे ते पाहा. प्रथम ५०० ग्रॅम ताजी गुलाबाची फुले घ्या आणि त्याच्या पाकळ्या वेगळे करा.
(Freepik)त्यानंतर एका भांड्यात १ लिटर पाणी उकळून त्यात गुलाबाची सर्व पाकळ्या टाका. हे पाणी झाकून ठेवा आणि उकळू द्या. तुम्हाला पाण्याचा रंग बदलताना दिसेल.
(Freepik)जेव्हा पाण्याचा रंग बदलतो आणि एक लिटर ते अर्धा लिटर शिल्लक राहते तेव्हा गॅस बंद करा.
(Freepik)आता ते सुती कापडाने गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे बाजारात मिळणाऱ्या गुलाब जलपेक्षा जास्त फायदेशीर आहे. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर स्प्रे करू शकता. हे तुमच्या त्वचेचे छिद्रही स्वच्छ करते आणि चेहऱ्याला मुरुमांपासून वाचवते. याशिवाय पाण्याऐवजी तुम्ही हे गुलाब जल स्क्रब आणि फेस पॅकमध्ये मिक्स करू शकता.
(Freepik)