Multigrain Methi Thepla Recipe: नाश्त्यासाठी बनवा मल्टीग्रेन मेथी थेपला, नोट करा रेसिपी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Multigrain Methi Thepla Recipe: नाश्त्यासाठी बनवा मल्टीग्रेन मेथी थेपला, नोट करा रेसिपी!

Multigrain Methi Thepla Recipe: नाश्त्यासाठी बनवा मल्टीग्रेन मेथी थेपला, नोट करा रेसिपी!

Dec 06, 2023 10:12 AM IST

Breakfast recipe: गुजरातची प्रसिद्ध डिश मल्टीग्रेन थेपला हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe (Freepik)

Multigrain Methi Thepla Recipe: असे अनेक प्रसिद्ध पदार्थ देशभरात तयार आणि खाल्ले जातात. मल्टीग्रेन मेथी थेपला देखील अशाच एका पदार्थांपैकी एक आहे. हे गुजरातची प्रसिद्ध डिश आहे. मल्टीग्रेन थेपला हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा पौष्टिक नाश्ता जितका चविष्ट आहे तितकाच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. मेथीमध्ये असे अनेक गुण असतात जे अनेक रोगांशी लढण्यास सक्षम आहे. मेथी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मेथीचा थेपला नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. चला जाणून घेऊया मल्टीग्रेन मेथी थेपला बनवण्याची सोपी पद्धत-

लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ - १ कप

ज्वारीचे पीठ - १ वाटी

नाचणीचे पीठ - १ वाटी

बेसन - १ वाटी

दही - २ कप

हिंग - १ चिमूटभर

ओवा - 1 टीस्पून

चिरलेली मेथी - २ कप

आले-लसूण पेस्ट- १ टीस्पून

पिसलेली लाल मिरची - १ टीस्पून

हिरवी मिरची पेस्ट - १ टीस्पून

धनिया पावडर - १ टीस्पून

तेल - २ चमचे (अंदाजे)

मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

मल्टीग्रेन मेथी थेपला बनवण्यासाठी सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात सर्व पीठ मिक्स करा. यानंतर त्यात दही, थोडे तेल आणि मसाले एकत्र करून त्यात पाणी घाला. यानंतर ते चांगले मळून घ्या. मात्र, पीठ जास्त सैल होऊ नये म्हणून थोडे-थोडे पाणी घालावे लागते. मळल्यानंतर तेलाने ग्रीस करा. नंतर काही काळ असेच राहू द्या. असे केल्याने पीठ गुळगुळीत होईल, त्यामुळे थेपला फाटणार नाही.

थेपला लाटल्यावर फ्राय पॅन घ्या आणि गरम करा. आता मल्टीग्रेन पिठाचा गोळा गोल आकारात लाटून घ्या. चपातीसारखे बनवा. पराठा जसा बनवला जातो तसाच थेपला बनवा. आता तव्यावर थेपला सोबत थोडे तेल घालून शिजवत रहा. जर तुम्हाला ते कुरकुरीत करायचे असतील तर आच थोडी वाढवा. अशा प्रकारे तुमचा मल्टीग्रेन मेथी थेपला तयार आहे. आता तुम्ही ते लोणच्यासोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

Whats_app_banner