पाऊस सुरु झाल्यावर डासांची उत्पत्ती वाढते. डासांच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी दिवसा किंवा रात्री झोपताना मच्छरदाणी लावावी. मात्र, मच्छरदाणीत राहणे नेहमीच शक्य नसते. त्यामुळे घरातून डासांना बाहेर काढणे गरजेचे आहे.
डासांना दूर करण्यासाठी अनेक जण विविध कॉईल, एरोसोलसह स्प्रे वापरतात. तथापि, ते मानवी आरोग्यासाठी देखील फारसे चांगले नाहीत. त्यामुळे याचा वापर न करता तुम्ही घरीच डास रिपेलेंट बनवू शकता. काय करावे ते येथे जाणून घ्या.
एक कप पाण्यात लॅव्हेंडर ऑइलचे १० थेंब, व्हॅनिला इसेंसचे ४-५ थेंब आणि लिंबाचा रस ४ थेंब मिसळून चांगले ढवळावे. आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये घेऊन हात-पायावर चांगले स्प्रे करावे. डास चावणार नाहीत.
कडुनिंबाचे तेल डास, माश्या किंवा कीटकांना दूर ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावते. यासाठी कडुनिंबाच्या तेलाचे १०-१२ थेंब ३० मिली खोबरेल तेलात मिसळून संपूर्ण शरीरावर लावावे.
३ चमचे बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये इसेंशियल ऑइलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण सकाळी आणि रात्री दोन वेळा स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरल्यास डास जवळ येणार नाहीत.
त्याचप्रमाणे ३० मिली खोबरेल तेलात टी ट्री ऑइलचे १०-१५ थेंब मिसळा. आता हे मिश्रण संपूर्ण शरीरावर लावा. तुमच्या जवळ डास दिसणार नाही.