हिवाळ्याच्या थंड हवेत आपली त्वचा हळूहळू डेड होऊ लागते. तुम्ही वर्षभर वापरत असलेले मॉइश्चरायझर हिवाळ्यात काम करत नाही. त्यामुळे थंडीत तुमच्या त्वचेची वेगळ्या पद्धतीने काळजी घ्या.
हिवाळ्यात त्वचा हायड्रेट करण्यासाठी शिया बटर किंवा कोकोनट बटरसह मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता वाढेल. पण दिवसभर एकदाच मॉइश्चरायझर वापरु नका.
रात्री झोपण्यापूर्वी नाईट सीरमचा नियमित वापर करा. याचा वापर केल्याने त्वचा मुलायम राहते. त्वचेची आर्द्रताही राखली जाईल. नाईट सीरम नियमित लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
हिवाळ्यात ओठ खूप फाटतात. त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. ओठ सुंदर ठेवण्यासाठी लिप-बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा नियमित वापर करा. हे ओठ फाटण्यापासून वाचवते.