आरोग्य तज्ञांच्या मते थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडामुळे हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो. गरोदरपणात थायरॉईडच्या समस्येमुळे स्त्री आणि गर्भाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते
(Freepik)आपल्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे अनेकदा थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. गरोदर महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या महिलेला आधीच हायपरथायरॉईडीझमची समस्या असेल तर तिने मीठ कमी खावे.
ताण तणाव शक्य तितका कमी करा. आपण जितका जास्त ताण घ्याल तितकी थायरॉईडची समस्या वाढेल. गरोदरपणात थायरॉईडची समस्या सामान्य असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.