हिवाळा सुरु होताच सर्दी, खोकल्याचा त्रास वाढतो. याशिवाय आणखी एका समस्येमुळे थंडीच्या दिवसात चिडचिड होते. ते म्हणजे घसा खवखवणे. घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी वारंवार औषधाचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी काही नियमांचे पालन केले पाहिजे. ज्यामुळे या समस्येपासून सहज सुटका मिळू शकते.
(Freepik)रोज सकाळी कोमट पाण्याने गार्गल करा. कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गार्गल केल्यास हिवाळ्यात घसा खवखवण्याच्या समस्येपासून सहज सुटका मिळते.
(Freepik)रोज सकाळी एक चमचा मध २-३ तुळशीच्या पानांसोबत खा. त्यामुळे सर्दीची समस्या दूर होते. आणि यामुळे घसादुखीपासूनही आराम मिळू शकतो.
(Freepik)घसा नेहमी उबदार कपड्याने झाकून ठेवा. शक्यतो थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्यावी. कान, डोके, मान कधीही उघडे ठेवू नका.
(Freepik)घसा दुखत असल्यास अधूनमधून कोमट पाणी प्या. यामुळे घशातील संसर्ग दूर होतो आणि घसादुखीपासून आराम मिळतो
(Freepik)