Heart Attack : ‘ही’ लक्षणे सांगतात तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका! घरच्या घरीच करा ४ मोफत तपासण्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Heart Attack : ‘ही’ लक्षणे सांगतात तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका! घरच्या घरीच करा ४ मोफत तपासण्या

Heart Attack : ‘ही’ लक्षणे सांगतात तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका! घरच्या घरीच करा ४ मोफत तपासण्या

Heart Attack : ‘ही’ लक्षणे सांगतात तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका! घरच्या घरीच करा ४ मोफत तपासण्या

Nov 20, 2024 09:20 PM IST
  • twitter
  • twitter
Simple Home Test For Heart Health : निरोगी जीवन जगण्यासाठी, निरोगी हृदय असणे आवश्यक आहे. अनेक वेळा हृदयविकाराची लक्षणे दिसून येत नाहीत आणि हृदयविकाराचा झटका अचानक येतो.
तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल, तर शरीरातील प्रमुख अवयव निरोगी असणे गरजेचे आहे. असाच एक महत्त्वाचा शरीराचा भाग म्हणजे तुमचे हृदय. अनेक वेळा आपल्याला कळत नाही आणि आपल्या हृदयावरील भार वाढत जातो. ज्यामुळे हृदयरोग आणि अगदी हृदयविकाराचा झटका येतो. आता काही कारणास्तव तुम्ही चेकअपसाठी जाऊ शकत नसल्यास, तुम्ही घरी जाऊन तपासू शकता.
twitterfacebook
share
(1 / 7)

काही आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य घरीच तपासायचे असेल तर तुम्ही काही चाचण्या करू शकता. यातील पहिली तपासणी म्हणजे ‘रेस्टिंग हार्ट’ आहे. ही तपासणी घरच्या घरी करणे सर्वात सोपे आहे. यात आपण पल्स ऑक्सिमीटरवर आपल्या हृदययाची गती सतत तपासून पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 7)

ऑक्सिमीटर नसल्यास, १०-१५ मिनिटे आरामशीर स्थितीत बसा. मग, तुमचे बोट तुमच्या नाडीवर ठेवा आणि पल्स बीट्स १५ सेकंद मोजा. आता तुम्ही जितक्या वेळा तुमची नाडी ऐकता तितक्या वेळा ४ने गुणा. ही एका मिनिटाची तुमच्या हृदयाची गती असेल. ६० ते १०० दरम्यान हृदय गती सामान्य आहे. हृदय गती जितकी कमी, तितके हृदय निरोगी.
twitterfacebook
share
(3 / 7)

दुसरा मार्ग म्हणजे रक्तदाब तपासणे. रक्तदाब उच्च राहिल्यास, तुमच्या रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. १२०/८० हा सामान्य रक्तदाब मानला जातो. जर, तुमच्याकडे मशीन नसेल तर, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासू शकता.
twitterfacebook
share
(4 / 7)

‘स्टेप टेस्ट’साठी तुम्हाला काही पायऱ्या चढ-उतार कराव्या लागतील. या पायऱ्या १२ इंचाच्या असाव्यात. त्यावर तीन मिनिटे चढ-उतर करावा. या दरम्यान वेग समान ठेवा. यानंतर खाली बसून ताबडतोब हृदयाची गती तपासा. तुमच्या हृदयाचे ठोके जलद होतील. जितक्या लवकर तुमच्या हृदयाचे ठोके सामान्य होतात तितके तुमचे हृदय निरोगी असते. जर, हृदयाचे ठोके सामान्य होण्यास वेळ लागत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
twitterfacebook
share
(5 / 7)

जर तुम्ही ४५ मिनिटे न थांबता वेगाने चालत असाल, तर तुमचे हृदय निरोगी आहे. चालताना धडधडणे किंवा धाप लागणे हे निरोगी हृदयाचे लक्षण नाही. जड वस्तू उचलताना किंवा पायऱ्या चढतानाही छातीत दुखणे, थकवा येणे, चक्कर येणे, धाप लागणे यासारख्या समस्या जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
twitterfacebook
share
(6 / 7)

यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या कोलेस्टेरॉलवर लक्ष ठेवा. हृदय मजबूत करण्यासाठी, डॉक्टर दररोज ३० मिनिटे चालण्याची शिफारस करतात. यासोबतच श्वासोच्छवासाचे व्यायाम तुमचे हृदय आणि फुफ्फुस दोन्ही मजबूत ठेवतील.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज