‘मामा’ संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारणारी शर्मीन सेगल तिच्या अभिनयामुळे ट्रोल होत आहे. ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये ‘तवायफ’ बनलेली शर्मीन सेगल इतर अभिनेत्रींमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकली नाही.
सोशल मीडियावर तिची ‘एक्स्प्रेशनलेस’ अभिनेत्री म्हणून वर्णन केले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ‘हीरामंडी’मध्ये सर्वात कमकुवत परफॉर्मन्स दिल्यानंतरही अभिनेत्रीला तिचे मामा संजय लीला भन्साळी यांनी मोठी फी दिली होती.
शर्मीनने तिच्या फिल्मी करिअरमध्ये मोजकेच चित्रपट केले आहेत. मात्र, त्यानंतरही तिला तब्बल ३५ लाख रुपये फी म्हणून देण्यात आली आहे. तर, उत्तम अभिनेत्री संजीदा शेख हिला ४० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. म्हणजेच शर्मीनला संजीदापेक्षा केवळ ५ लाख रुपये कमी मानधन देण्यात आले आहे. या सीरिजमध्ये संजीदाने ‘वहिदा’ ही व्यक्तिरेखा साकारली होती, जिला आणखी काही स्क्रीन स्पेस दिली असती तर धमाका झाला असता.
शर्मीन आणि संजीदा व्यतिरिक्त, सोनाक्षी सिन्हाने २ कोटी रुपये, मनीषा कोईरालाने १ कोटी रुपये, रिचा चड्ढाने १ कोटी रुपये आणि आदिती राव हैदरीने या मालिकेसाठी १ ते १.५ रुपये फी घेतली आहे. या सीरिजचे एकूण बजेट २०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
शर्मीन सेगलने २०१९ मध्ये ‘मलाल’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात मीझान जाफरी तिचा नायक होता. विशेष म्हणजे संजय लीला भन्साळी स्वत: आपल्या भाचीचे करिअर सावरण्यासाठी पुढे आले होते. शर्मीनच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. मात्र, त्यानंतरही अभिनेत्री काही खास जादू दाखवू शकली नाही.