Ganesh Chaturthi 2023 : देशातील अनेक शहरांमध्ये गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळत आहे. भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत केलं आहे.
(ANI)राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणी भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.
(ANI)लाडक्या बाप्पांना घरी आणताना अनेकांनी ढोल-ताशांचा गजरात आरती केली. त्यामध्ये तरुणांपासून चिमुकले आणि जेष्ठ व्यक्तींनी देखील सहभाग घेतल्याचं दिसून आलं. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी दिल्लीतील बाजारांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
(ANI)गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी शाळांमध्येही भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी गणरायाचं स्वागत केलं आहे. विद्यार्थीनींनी प्रत्येकाची गणेशमूर्ती, पूजेचं सामना समोर ठेवत पूजाअर्चना केली आहे. त्यामुळं अनेकांनी या मुलांचं कौतुक केलं आहे.
(PTI)भाविकांनी गणपतीच्या मूर्तीला सोनेरी रंग देत त्याची घरात प्रतिष्ठापना केली. दिल्लीतील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्ती भाविकांनी खरेदी केल्या आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन लोक राहतात. दरवर्षी मराठी माणूस सर्व कामं बाजूला ठेवत गणरायाचं स्वागत करत असतो.
(ANI)