(1 / 4)बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एका कार्यक्रमादरम्यान तिच्या कुटुंबातील मजेदार नावांचे रहस्य उघड केले आहे. करिश्माने तिला ‘लोलो’ हे नाव कसे पडले ते सांगितले. एवढेच नाही, तर तिची बहीण करीनाचे नावही क्यूट आहे. इंडस्ट्रीतील सगळेच करीना कपूर-खानला ‘बेबो’ या टोपण नावाने हाक मारतात. करिश्माने सांगितले की, तिच्या कुटुंबात डब्बू, चिंटू, चिंपू अशी मजेदार नावे आहेत, त्यामुळे त्याच क्रमाने तिला आणि कारीनालाही अशी नावे मिळाली.(PTI)