Photo: 'तुंबाड'मधून सगळ्यांना हादरवणाऱ्या सोहम शाहने ‘या’ चित्रपटांमध्येही केलंय काम! तुम्ही पाहिलेत का?-horror film tumbbad re release watch actor sohum shah ott films from kangana ranaut irrfan khan ship of theseus ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo: 'तुंबाड'मधून सगळ्यांना हादरवणाऱ्या सोहम शाहने ‘या’ चित्रपटांमध्येही केलंय काम! तुम्ही पाहिलेत का?

Photo: 'तुंबाड'मधून सगळ्यांना हादरवणाऱ्या सोहम शाहने ‘या’ चित्रपटांमध्येही केलंय काम! तुम्ही पाहिलेत का?

Sep 12, 2024 03:58 PM IST
  • twitter
  • twitter
हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट हॉरर समजला जाणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सोहम शाहचा हा चित्रपट २०१८मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
अभिनेता सोहम शाहचा ‘तुंबाड’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असून, चाहत्यांमध्ये या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच सोहम शाहने चित्रपटाची निर्मिती देखील केली होती.
share
(1 / 7)

सोहम शाह एक उत्कृष्ट अभिनेता आणि निर्माता आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांची नावे सांगणार आहोत, ज्यात सोहम शाहने दमदार काम केले आहे.
share
(2 / 7)

२००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाबर’ या चित्रपटातून सोहम शाहने अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटात सोहम शाहसोबत मिथुन चक्रवर्ती, ओम पुरी आणि मुकेश तिवारी सारखे कलाकार दिसले होते. हा एक क्राइम ड्रामा चित्रपट होता. आजही हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
share
(3 / 7)

यानंतर सोहम शाहच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘शिप ऑफ थिसिअस’ हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटात सोहम शाहनेही काम केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. सोहमने स्वतः देखील या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८ आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
share
(4 / 7)

२०२३मध्ये सोहम शाह ‘रोअर’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकली होती. ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज होती. या सीरिजच्या आयएमडीबी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, तिला ७.६ रेटिंग मिळाले आहे. ही सीरिज तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
share
(5 / 7)

सोहम शाह २०१७मध्ये रिलीज झालेल्या कंगना रणौतच्या ‘सिमरन’ चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ५.२ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
share
(6 / 7)

२०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तलवार’ या चित्रपटात सोहम शाहने एसीपी वेदांतची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आरुषी हत्याकांडावर आधारित होता. या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज