(4 / 13)मिथुन: आज दिनमान अनुकूल राहणार नाही. आज कायद्याच्या नियमाच्या विरुद्ध काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता राहील. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. आज दैवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. प्रकृती आस्थिर राहणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.