(2 / 4)या स्मार्टफोनमध्ये ७.९२ इंचाचा LTPO OLED प्राइमरी डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझोल्यूशन 2156x2344 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर १२०Hz आहे, जो एचडीआर १० प्लसला सपोर् करतो. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस १,६०० निट्स आहे. यात १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.४३ इंच कव्हर स्क्रीन आहे. दुसऱ्या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस २,५०० निट्स आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते. याशिवाय, हा स्मार्टफोन १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटसह देखील लॉन्च करण्यात आला आहे.