गेल्या महिन्यात होंडा ॲक्टिव्हाच्या २ लाख २७ हजार ४५८ युनिट्सची विक्री झाली होती, तर, गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा २ लाख १४ हजार ४५८ युनिट्स इतका होता. यावेळी कंपनीने १२ हजार ५८६ अधिक युनिट्सची विक्री केली.ॲक्टिव्हा स्कूटरची विक्री सातत्याने वाढत आहे. या स्कूटरची किंमत ७६ हजार रुपयांपासून सुरू होते.
होंडा ॲक्टिव्हामध्ये ११० सीसी ४ स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमुळे ग्राहकांना चांगली पॉवर आणि चांगले मायलेजही मिळते. ही स्कूटर एका लिटरमध्ये ५० किलोमीटरपर्यंत मायलेज देते. या स्कूटरमध्ये १२ इंच टायर देण्यात आले. यात ५.३ लीटरची इंधन टाकी आहे. दैनंदिन वापरासाठी आणि कार्यालयात जाण्यासाठी ही एक चांगली स्कूटर आहे.
होंडा ॲक्टिव्हाची थेट स्पर्धा टीव्हीएस ज्युपिटरशी आहे. ज्युपिटर आता नवीन अवतारात आली असून या स्कूटरच्या डिझाइन आणि इंजिनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर आता नवीन ज्युपिटर ११० स्कूटरमध्ये नवीन इंजिन बसवण्यात आले आहे.