(5 / 4)'अप्पी आमची कलेक्टर' मधली शिवानी नाईक ने सांगितले, "होळी हा माझा आवडता सण आहे. लहानपणी होळीच्या रात्री मी झोपायचीच नाही, आम्ही सर्व गच्चीत फुगे बनवणे आणि रंगाचे पाणी तयार करणे, कोरडे रंग एका ताटात काढणे हा सर्व कार्यक्रम सोसायटीच्या गच्ची वर चालू असायचा. धुळीवंदनच्या दिवशी सकाळी आई-बाबा नेहमी सांगायचे की डोक्यापासून पायाच्या बोटा पर्यंत तेल लावून जा होळी खेळायला आणि मला वाटत हा उपाय घरो घरी वापरला जात असावा. कारण ह्या मुळे रंग पंचमी खेळून आल्यावर फार त्रास होत नाही. सर्वानी नैसर्गिक रंगानं सोबत होळी खेळली तर कोणालाही तितका त्रास होणार नाही."