वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपापल्या चक्रात जागा बदलतो. ग्रह-ताऱ्यांची स्थानं बदलल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होतो, तसेच, अनेक राशींवर त्याचा वाईट परिणामही होतो. आगामी काळात होळी येण्याआधीच शुक्राचे संक्रमण सुरू होत आहे. त्यामुळे होळी पौर्णिमेआधीच अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे.
२३ मार्च रोजी दुपारी २ वाजून ४७ मिनिटांनी ग्रहांचा ग्रह शुक्र पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तो ३ एप्रिलपर्यंत त्याच स्थानी राहणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. दरम्यान, पौर्णिमा २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुरू होत आहे. त्याआधी अनेक राशीच्या लोकांना या शुक्र गोचराचा फायदा होणार आहे.
वृषभ : व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी सर्व बाबतीत प्रचंड नफा होईल. विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. भागीदारी व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
कर्क : कोणतेही काम नव्या उत्साहात करू शकता. टीमवर्क करून तुम्ही कोणतेही काम करू शकता. तुम्हाला अनेक ठिकाणाहून नफा मिळेल. नोकरदारांच्या करिअरमध्ये मोठा फायदा होईल. अनपेक्षित धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. या वेळी गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक ताण थोडा कमी होईल.