Photos: पाकिस्तानात ‘ट्रक आर्ट’ची अनोखी, चित्रमय दुनिया; धावत्या ट्रकसोबत आकर्षक चित्रांचाही प्रवास
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos: पाकिस्तानात ‘ट्रक आर्ट’ची अनोखी, चित्रमय दुनिया; धावत्या ट्रकसोबत आकर्षक चित्रांचाही प्रवास

Photos: पाकिस्तानात ‘ट्रक आर्ट’ची अनोखी, चित्रमय दुनिया; धावत्या ट्रकसोबत आकर्षक चित्रांचाही प्रवास

Photos: पाकिस्तानात ‘ट्रक आर्ट’ची अनोखी, चित्रमय दुनिया; धावत्या ट्रकसोबत आकर्षक चित्रांचाही प्रवास

Jan 17, 2025 08:11 AM IST
  • twitter
  • twitter
Pakistan Truck Art : पाकिस्तानात ट्रक रंगवण्याची परंपरा मोठी आहे. येथील ट्रकमालक मोठा खर्च करून विविध, आकर्षक चित्रांनी संपूर्ण ट्रक रंगवतात. यामागे अनेक धारणा आहेत. त्याविषयी…
पाकिस्तानमध्ये रंगीबेरंगी, सुशोभित केलेले ट्रक रस्त्यांवर आणि महामार्गांवर दिसणे हे एक सामान्य दृष्य आहे. पाकिस्तानात ट्रक रंगवण्याची कला गेल्या शतकभराच्या काळात उदयास आलेली आहे. याला पाकिस्तानी ट्रक कला (Pakistani Truck Art) म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानात ट्रक रंगवणे ही केवळ एक सांस्कृतिक अभिव्यक्ती नसून येथील जनमानसात खोलवर रुजलेली परंपरा आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

आर्टिस्ट हाजी हुसेन हे फाळणीपूर्वी भारतात राजे-महाराजांच्या मालकीच्या राजवाड्यांमध्ये पेंटिंग करत असत. हुसेन हे फाळणीनंतर पाकिस्तानातील कराचीत स्थायिक झाले. फाळणीनंतर पूर्वीसारख्या भव्य राजवाड्यांची निर्मिती होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते ट्रक सजवण्याच्या कलेकडे वळले. ट्रकवर विविध फुलांची आकर्षक चित्रे काढण्यासाठी ते पाकिस्तानात प्रसिद्ध आहेत. 
twitterfacebook
share
(2 / 5)

पाकिस्तानात ट्रक रंगवणारे अनेक कलावंत आहेत. ट्रकवर विविध रंगाचे चित्र, दृष्य, व्यक्ती आणि घटना रंगवल्या जातात. ट्रकवर रंगवण्यात आलेल्या अनेक चित्रांमध्ये महत्वपूर्ण अशा धार्मिक व राजकीय इतिहासातील घटनांचे संदर्भ लपलेले असतात. ट्रकवर सूफी संतांची चित्र रंगवल्यामुळे ट्रकला अपघात होणार नाही, अशी येथील ट्रक चालकांमध्ये धारणा असते. या फोटोमध्ये पाकिस्तानातील कराची शहरात एका वर्कशॉपमध्ये ट्रकवर चित्र काढताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

(AP)
पाकिस्तानात १९२० च्या दशकापासून ट्रक रंगवण्याची कला सुरू झाली. पूर्वी ट्रकवर प्रामुख्याने फुले, निसर्ग चित्रे काढण्यात येत असत. १९६० च्या दशकात जगभरात होत असलेल्या राजकीय उलथापालथीचा प्रभाव येथील ट्रक आर्टवर सुद्धा पडला. काही कलावंत राजकीय नेते, राजकीय घटनांचे चित्रण ट्रकवर करू लागले.

दक्षिण अमेरिकन क्रांतिकारक चे गवेरा, पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांचे पोर्ट्रेट अनेक ट्रकवर झळकली होती.
twitterfacebook
share
(4 / 5)

पाकिस्तानात १९२० च्या दशकापासून ट्रक रंगवण्याची कला सुरू झाली. पूर्वी ट्रकवर प्रामुख्याने फुले, निसर्ग चित्रे काढण्यात येत असत. १९६० च्या दशकात जगभरात होत असलेल्या राजकीय उलथापालथीचा प्रभाव येथील ट्रक आर्टवर सुद्धा पडला. काही कलावंत राजकीय नेते, राजकीय घटनांचे चित्रण ट्रकवर करू लागले. दक्षिण अमेरिकन क्रांतिकारक चे गवेरा, पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांचे पोर्ट्रेट अनेक ट्रकवर झळकली होती.

पाकिस्तानात साधारण १९२० च्या दशकात इंग्लंडच्या बेडफोर्ड कंपनीचे ट्रक दाखल झाले. ट्रक रंगवल्यामुळे उत्तम वाहतूक व्यवसाय होतो, अशी येथील काही ट्रक मालकांमध्ये धारणा आहे. एक ट्रक रंगवण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. इंग्लंडमध्ये वेल्सची राजकुमारी लेडी डायनाचा १९९७ साली अपघाती मृत्यू झाला. लेडी डायना पाकिस्तानात येऊन गेली होती. शिवाय एका ब्रिटनस्थित पाकिस्तानी डॉक्टरसोबत डायनाची मैत्री असल्याचे बोलले जात होते. १९९७ साली लेडी डायनाच्या अपघाती मृत्यूनंतर एका ट्रक चालकाने आपल्या ट्रकवर डायनाचे चित्र असे चितारले होते.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज