बॉलिवूड चित्रपटांना हॉलिवूड चित्रपटांपेक्षा वेगळे बनवणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक गाणी आहेत. गेल्या काही दशकांत चित्रपटसृष्टीने खूप मोठी मजल मारली आहे. एक काळ असा होता की, चित्रपटांमध्ये अनेक गाणी असायची आणि प्रत्येक गाणं मोठं असायचं. पण, आजकाल तसे होत नाही. चित्रपटात गरज नसल्यास निर्माते मर्यादित गाणी ठेवतात. पण, सर्वाधिक गाणी असलेल्या काही हिंदी चित्रपटांची नावे तुम्हाला माहीत आहेत का?
१९३२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंद्रसभा' या चित्रपटापासून ही यादी सुरू होते. 'गाना डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार, हा असा बॉलिवूड चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्वाधिक गाणी होती. निर्मात्यांनी या चित्रपटात ७०हून अधिक गाणी समाविष्ट केली आहेत.
या यादीत सलमान खानच्या चित्रपटांचेही नाव आहे. १९९४मध्ये रिलीज झालेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटानेही गाण्यांच्या बाबतीत रेकॉर्ड बनवला होता. या कौटुंबिक चित्रपटात एक-दोन नव्हे, तर एकूण १४ गाणी होती.
१९८१मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या 'सिलसिला' चित्रपटातही अनेक गाणी होती. या चित्रपटात एकूण १२ गाणी होती, त्यापैकी अनेकांना आजही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये जागा आहे.
१९९९मध्ये रिलीज झालेला अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट 'ताल' देखील या यादीत सामील आहे. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात १२ गाणी होती, जी त्यावेळी खूप गाजली होती. चित्रपटाचा टायटल ट्रॅक आजही खूप पसंत केला जातो.
या यादीत सलमान खानचा आणखी एक चित्रपट आहे. २००३मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'तेरे नाम'मध्ये देखील एकूण १२ गाणी होती ज्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली होती.