गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत. आता चित्रपटांमध्ये अनावश्यक लिपलॉक सीन्स तसे कमीच दिसतात. मात्र, एक काळ असा होता की चित्रपटांमध्ये चुंबन दृश्ये किंवा रोमँटिक सीन केवळ चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी समाविष्ट केले जात होते. चला तर मग आज जाणून घेऊया अशा काही हिंदी चित्रपटांबद्दल ज्यामध्ये जास्तीत जास्त किसिंग सीन दाखवण्यात आले आहेत.
या यादीत पहिले नाव आहे नील नितीन मुकेश आणि सोनल चौहानचा हॉरर-थ्रिलर चित्रपट '3G'. हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर एकही विक्रम मोडू शकला नसला, तरी त्याने सर्वाधिक चुंबन दृश्यांचा विक्रम नक्कीच केला. चित्रपटात एक-दोन नाही तर, ३० किसिंग सीन दाखवण्यात आले होते.
२००५मध्ये रिलीज झालेला 'नील अँड निक्की' हा एक अतिशय बोल्ड चित्रपट होता, ज्यामध्ये अनेक किसिंग सीन्सचा समावेश होता. उदय चोप्रा आणि तनिषा मुखर्जी अभिनीत या चित्रपटात अंदाजे २१ किसिंग सीन होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.
अनुराग बसू दिग्दर्शित 'मर्डर' हा इरोटिक थ्रिलर चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत अभिनीत या चित्रपटात २० चुंबन दृश्ये आणि अनेक बोल्ड गाणी होती, ज्यामुळे चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली.
मल्लिका शेरावतचा 'ख्वाहिश' हा २००३साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक होता, ज्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. चित्रपटात फक्त एक-दोन नव्हे तर, यात एकूण १७ चुंबन दृश्ये होती, त्यामुळे त्या वेळी भरपूर सीडी आणि डीव्हीडी विकल्या गेल्या होत्या.
या यादीत आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांच्या 'मलंग' चित्रपटाचाही समावेश आहे. चित्रपटात दमदार ॲक्शन दाखवण्यात आले होती, पण रोमँटिक सीक्वेन्सचीही कमतरता नव्हती. अंडरवॉटर किसिंग सीनपासून ते उलटे लटकत किसिंग सीनपर्यंत अनेक असे सीन्स होते, जे खूप व्हायरल झाले.