एका महिन्यात अदानी समूहाचे १२ लाख कोटींची घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात अदानी समूहाची ही विक्रमी पडझड आहे. एकेकाळी टीसीएस, रिलायन्ससारख्या नामांकित कंपन्यांच्या शेअर बाजारातही अदानी समूह अव्वल होता. पण ते जितक्या वेगाने वर उठले तितक्याच वेगाने खाली कोसळले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी सूमहाचे वासे फिरले आहेत.
(AFP)२४ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२३ या एक महिन्यात अदानी समूहाचे बाजारातून १२ लाख कोटींहून अधिक रुपये उडाले आहेत. हिंडेनबर्गने आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपानंतर अदानीच्या अनेक समभागांची विक्री झाली आहे.
(AFP)स्टॉक्सबॉक्स तांत्रिक विश्लेषक रोहन शाह यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की, अदानी समूहाचे बाजार भांडवल आता ते जेव्हा शिखरावर होते त्यापेक्षा सुमारे ७०% कमी आहे.
(AFP)गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीत शेअर्सच्या तुलनेत अधिक घट झाली आहे. गौतम अदानी एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. आणि आता तो जगातील सर्वात श्रीमंत २५ व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत. फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते अनुक्रमे २६व्या आणि २९व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४५ अब्ज डॉलरच्या खाली गेली आहे.
(AP)चिंताग्रस्त गुंतवणूकदारांना तसेच बाजाराला दिलासा देण्यासाठी अदानी समूहाने वारंवार आश्वासने दिली आहेत. त्यांनी हिंडेनबर्गचा अहवाल निराधार आणि चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कंपनीने काही मोठ्या कर्जाची परतफेडही केली आहे. याशिवाय, अदानी समूहाने हिंडेनबर्गविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
(AP)