हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षराच्या व्यक्तिरेखेने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे. हिनासाठी हा काळ खूप कठीण गेला आहे. तिने गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये स्टेज-थ्री ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती दिली होती. या बातमीने केवळ हिनाचे चाहतेच नाही तर स्टार्सही हादरले.
हिना खान सध्या तिच्या 'गृहलक्ष्मी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता हिनाने 'गृहलक्ष्मी' मालिकेतील काही न पाहिलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोत हिना खान खूपच वेगळी दिसत आहे. एक वेगळाच निरागसपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. काळ्या ब्लाउजसोबत केशरी रंगाची साडी हिनाला खूप शोभून दिसत आहे.
हिनाची वेब सीरिज 'गृहलक्ष्मी' या महिन्यात १६ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म एपिक ऑनवर प्रसारित झाली आहे. यामध्ये तिने एका धाडसी आणि सशक्त महिलेची भूमिका साकारली आहे.