हिमाचल प्रदेशात बुधवारी उंच पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी झाली. अनेक पर्यटकांनी कुफरी हिल रिसॉर्टमध्ये हिमवर्षावाचा आनंद घेतला. शिमल्यातही आज बर्फवृष्टी झाली.
(ANI)भारतीय हवामान खात्याने पुढील ४८ तासांत हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये हिमवृष्टी आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
(ANI)मनाली, डलहौसी, सांगला, नारकंडा आणि कुफरी या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर मध्यम हिमवृष्टी झाली, तर मध्य आणि सखल टेकड्यांवर विखुरलेला पाऊस पडला, ज्यामुळे दीर्घकाळ कोरडेपणा संपला.
(PTI)"आम्ही सुंदर बर्फवृष्टी पाहत आहोत. मला सांगण्यात आले आहे की ही २०२४ चा हा पहिला हिमवर्षाव आहे. आमच्यासाठी हे स्वर्गासारखे आहे. सफरचंद आणि शेतीसाठी हे हवामान चांगले आहे." कुफरी रिसॉर्ट येथे गुजरातमधील श्रीश या पर्यटकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
(PTI)"आम्ही हिमवर्षाव अनुभवण्याच्या आशेने कुटुंबासह येथे आलो आहोत, हिमवर्षाव आम्हाला अनुभवता आला याचा आम्हाला आनंद आहे. हा माझा जीवनातील पहिला अनुभव आहे, अशी भावना एका पर्यटकाने व्यक्त केली.
(ANI)शिमल्यातील कुफरी हिल रिसॉर्टमध्ये नवीन हिमवर्षावानंतर पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेत आहेत.
(ANI)शिमला जिल्ह्यातील नारकंडा येथे उणे -१.३ अंश सेल्सिअस, मनालीमध्ये १.४ अंश सेल्सिअस, कुफ्रीमध्ये ०.१ अंश सेल्सिअस, कुल्लूमधील भुंटरमध्ये ६.८ अंश सेल्सिअस, सोलनमध्ये ४.० अंश सेल्सिअस, डलहौसीमध्ये ४.० अंश सेल्सिअस, डलहौसीमध्ये १.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिमला येथे किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
(ANI)