बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटासाठी जिथे १०० कोटी रुपयांपर्यंत फी दिली जाते. तिथेच बॉलिवूड अभिनेत्रींना एका चित्रपटामागे २० कोटी ते ८ कोटी रुपये फी दिली जाते. जाणून घ्या, बॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती पैसे घेतात.
दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये घेते.
आलिया भट्टबद्दल बोलायचे झाले, तर तिची फी १५ कोटी रुपये आहे. तिच्या आगामी 'जिगरा', 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, तर फीच्या बाबतीत ती दीपिकाच्या पातळीपर्यंत पोहोचू शकते.
करिना कपूर खानचा 'जाने जान' हा चित्रपट लोकांना खूप आवडला. तिच्या 'क्रू' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तिची फी ८ ते ११ कोटींच्या दरम्यान पोहोचली आहे.
या यादीत कतरिना कैफचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. कतरिना एका चित्रपटासाठी ८ ते ११ कोटी रुपये मानधन घेते.
श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री २' येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सध्या श्रद्धा ८ ते ११ कोटी रुपये घेते, पण जर 'स्त्री २' हिट झाला, तर ती तिची फी वाढवू शकते.