High Blood Pressure: जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमधील दाब जास्त असतो, (१४०/९० किंवा त्यापेक्षा जास्त) तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
(1 / 6)
जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमधील दाब जास्त असतो, (१४०/९० किंवा त्यापेक्षा जास्त) तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. नियमितपणे आपल्या रक्तदाबाचे परीक्षण करणे हा आपल्या जीवनाचा एक भाग असायला हवा.
(2 / 6)
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ही खनिजे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी केळी अवश्य खावीत.
(3 / 6)
स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट अँथोसायनिन, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फॅटी अॅसिड उच्च रक्तदाब कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी स्ट्रॉबेरी आवर्जून खावीत.
(4 / 6)
डाळिंबामध्ये आढळणारे 'एसीई' नावाचे एंझाइम रक्तवाहिन्यांचा आकार नियंत्रित करून रक्तदाब कमी करण्यास मदत करते. डाळिंबाचे दाणे नियमित खावेत.
(5 / 6)
टरबूजमध्ये सोडियम कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लाइकोपीन आणि रक्तदाबाशी लढणारे इतर अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्यामुळे हे फळ उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते.
(6 / 6)
आंब्यात असलेले बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. उन्हाळ्याच्या मोसमात भरपूर आंबे बाजारात येत असल्याने, त्यांचा आहारात आवश्य समावेश करावा.