सध्या टीव्ही विश्वात अनेक नव्या मालिका येताना दिसत आहेत. तसेच त्यामध्ये काही नव्या कॉमेडी शोचा देखील समावेश आहे. नुकताच काही मराठी कलाकार हे हिंदी विश्वात पदार्पण करत आहेत. पण या सगळ्याला भाऊ कदम अपवाद ठरला आहे. त्याने हिंदी शोला नकार का दिला चला जाणून घेऊया..
सोनी वाहिनीवरील एक नवा कॉमेडी शो सुरु झाला आहे. या कॉमेडी शोचे नाव 'मॅडनेस मचाएंगे' असे आहे. या शोमध्ये हेमांगी कवी, गौरव मोरे आणि कुशल बद्रिके हे मराठी कलाकार दिसत आहेत. पण भाऊ कदम दिसत नाही.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानंतर भाऊ कदम यांनी 'हसताय ना? हसत राहा' या कार्यक्राची ऑफर स्विकारली. त्याच वेळी त्यांना हिंदी शोची देखील ऑफर आली होती. त्यांनी ती नाकारली हे सांगितले आहे.
लोकमत फिल्मीला भाऊ कदमने मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला की, ‘मला ऑफर आली होती. पण मी त्यांना नकार दिला. कारण इकडेही विनोद तिकडेही विनोद. खरं कारण वेगळे होते. मला थोडा गॅप घ्यायचा होता. रिलॅक्स व्हायचे होते. तेवढ्यात ही ऑफर आली होती. हिंदी म्हटले की थोडे अवघड होते आणि नवीन ठिकाणी रुळायला मला वेळ लागतो.’