पुरळ किंवा एक्ने ही एक समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होतो. हार्मोनल असंतुलन, खराब आहार, तेलकट त्वचा, प्रदूषण हे यासाठी कारणीभूत असतात. मुरुमांचा सहसा किशोरवयीन मुलांवर परिणाम होतो, परंतु तो कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकतो.
(Freepik)टी ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते मुरुमांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते आणि मुरुमांचा दाह देखील कमी करते.
(Freepik)याशिवाय एलोवेरा मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी खूप मदत करतात. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.
(Freepik)आयुर्वेदात कडुनिंबाला अँटी मायक्रोबियल गुणधर्मासाठी विशेष स्थान आहे. त्याची पाने बारीक करून मुरुमांवर लावल्याने ते लवकर बरे होते आणि बॅक्टेरिया दूर होतात.
(Freepik)