Health Benefits of Eating Raw Onion: कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती, पाचक आरोग्य, रक्तातील साखरेची पातळी राखणे, त्वचेचे आरोग्य असे अनेक फायदे होऊ शकतात.
(1 / 7)
उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी जास्त पाणी पिणे, कांदा खाणे असे उपाय आपण फॉलो करतो. चला तर मग जाणून घेऊया कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
(2 / 7)
कांदा व्हिटॅमिन सी, बी ६, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या मूलभूत पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अँटी-इंफ्लेमेटरी कंपाऊंड, अँटी- एलर्जी, अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध हे उष्णता कमी करते, ज्यामुळे जळजळ आणि अस्वस्थता कमी होते.
(3 / 7)
उष्णतेच्या लाटेमुळे काही लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने उष्णतेच्या प्रभावापासून तुमचे संरक्षण होऊ शकते
(4 / 7)
आहारातील फायबरचा एक चांगला स्त्रोत असल्याने कांदा पचन सुधारतो आणि आतड्याचे आरोग्य सुधारतो. उन्हाळ्यात कांदा पचनक्रियेसाठी चांगला असतो. कच्च्या कांद्यासोबत लिंबाचा रस पचन आणि पोटाच्या समस्या दूर करतो
(5 / 7)
अँटीऑक्सिडेंट, अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म औषधासारखे काम करतात. यात असलेले सेलेनियम रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन शरीरातील इन्फेक्शन आणि आजारांशी लढते
(6 / 7)
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत होते. यात सल्फर आणि क्वेरसेटिन सारख्या अँटीडायबेटिक संयुगे असतात, जे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करतात
(7 / 7)
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करते. सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेची चमक टिकून राहते. कांदा विषारी पदार्थ काढून त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतो.