Vastu Shastra : घरातल्या झाडूची दिशा ठरवते तुमच्या घरची समृद्धी
Vastu Shastra For Broom : घर स्वच्छ करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी झाडू कोणत्या दिशेला ठेवावी, कशी ठेवावी याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम घालून दिले गेले आहेत.
(1 / 6)
असं सांगितलं जातं की महालक्ष्मी माता १०८ गोष्टींमध्ये वास करते. याच १०८ गोष्टींमध्ये झाडूचाही समावेश आहे. घराची स्वच्छता करणारी झाडू लक्ष्मीदेवीचा निवास असल्याचंं मानलं गेलं आहे. आज आपण झाडू आणि वास्तुशास्त्र याचा संबंध पाहाणार आहोत.(Gettyimages)
(2 / 6)
जर आपल्या घरात सुख-संपत्ती नांदावी असं वाटत असेल तर झाडू नेहमी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी.(Gettyimages)
(3 / 6)
झाडूची दिशाही वास्तुशास्त्रात अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. झाडू नेहमी इशान्य दिशेला असावी आणि झाडू नेहमी इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा प्रकारे ठेवली गेलेली असावी.(Gettyimages)
(4 / 6)
घरामध्ये जुनी झाडू असल्यास त्याची त्वरित विल्हेवाट लावा. नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा वाढेल. तसेच झाडू उलट उभी करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक प्रभाव वाढतो ज्याचा परिणाम म्हणजे घरातील पैसा नष्ट होतो.(Gettyimages)
(5 / 6)
वास्तुशास्त्रानुसार, घर झाडण्यासाठी वापरल्या जाणार्या झाडूंची संख्या विषम असावी. घर मोठं असल्यास तीन झाडू खरेदी कराव्या घर लहान असल्यास एकच झाडू खरेदी करावा.(Gettyimages)
इतर गॅलरीज