Weight Loss Tips: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्टी, सेलिब्रेशन केले जाते. यावेळी अनेक पदार्थांची मेजवाणी असते. अशा वेळी वजनावर नियंत्रण कसे ठेवायचे असा प्रश्न पडला का? सोपा मार्ग पाहा.
(1 / 6)
नवरात्रीनंतरच सण उत्सवाचा काळ सुरु होतो. या महिन्यात सुद्धा ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असते. या काळात खाणेपिणे जोमाने सुरू असते आणि वजनही वाढते. अशावेळी वजनावर नियंत्रण कसे ठेवायचे? याचा सोपा मार्ग येथे पाहा. (Freepik)
(2 / 6)
वजन कमी करण्यासाठी पाणी हा सर्वात फायदेशीर घटक आहे. चरबी कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्याचे सेवन केल्याने चयापचय सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.(Freepik)
(3 / 6)
तेल, मीठ, मसाले असे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. तूप आणि लोणी टाळा. या सर्व पदार्थांमुळे वजन भयंकर वाढते. त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे टाळा. (Freepik)
(4 / 6)
आंबट दही वजन कमी करण्यास खूप मदत करते. जेवणानंतर दररोज एक वाटी आंबट दही खावे. दिवसातून दोनदा आंबट दही खाल्ल्यास वजन कमी करणे खूप सोपे होईल.(Freepik)
(5 / 6)
जास्त भाज्या खा. भाज्या खाल्ल्याने चयापचय क्रिया सामान्य होते. चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी नाश्त्यात भाज्यांचे सूप घ्या. सॅलड्स जास्त खा. भात-पोळी कमी आणि भाज्या जास्त खा. (Freepik)
(6 / 6)
रात्री कमी खा. रात्री हेवी अन्न खाऊ नका. ते खूप जलद गतीने चरबी वाढवते. त्यामुळे रात्री थोडे थोडे खा.(Freepik)