अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. पण अनेकांना अंडी खाणे आवडत नाही. अशा वेळी हे चवदार आणि प्रथिनेयुक्त शाकाहारी स्नॅक्स खाऊन ते प्रथिनांची कमतरता दूर करू शकतात
चणे स्नॅक्स: भाजलेले चणे सर्वात लोकप्रिय हेल्दी स्नॅक्सपैकी एक आहे. यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शंभर ग्रॅम भाजलेल्या चण्यांमध्ये १९ ग्रॅम प्रथिने असतात. यामुळे, प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हा ऑइल फ्री स्नॅक खूप लोकप्रिय आहे
सोयाबीन चाट: सोयाबीन हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानला जातो. सोयाबीनपासून बनवलेला चाट हा एक निरोगी आणि प्रथिनेयुक्त स्नॅक आहे. शंभर ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने असतात
अंकुरित कडधान्यः हरभरा आणि मूग डाळ अंकुरल्यानंतर खाण्यासाठी खूप आरोग्यदायी मानली जाते. त्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. सुमारे १०० ग्रॅम स्प्राउट्समध्ये १३ ग्रॅम प्रथिने असतात.
शेंगदाणा चाटचे प्रकार: शेंगदाणे भाजून किंवा उकळून स्नॅक म्हणून खाणे खूप सामान्य आहे. १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने असतात. शेंगदाण्यापासून बनवलेला चाट आरोग्यदायी आणि चवदार असतो.
(shutterstock)पनीरः पनीर प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो. स्नॅक्सबद्दल बोलायचे झाले तर पनीर टिक्का हा उत्तम आणि स्वादिष्ट प्रोटीन स्नॅक आहे. १०० ग्रॅम पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रथिने असतात. म्हणूनच, पनीर, चीज प्रकारचे स्नॅक्स हा या आवश्यक पौष्टिक कमतरतेवर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे