Best Foods To Quality Sperm And Sperm Health: प्रजनन क्षमतेस कारणीभूत शुक्राणूपेशी दर्जेदार आणि निरोगी नसल्यास मुले होणे कठीण आहे. या शुक्राणूंच्या कमी गुणवत्तेची चिंता करणाऱ्या पुरुषांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शुक्राणूंची गुणवत्ता आणि आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारणारे सर्वोत्तम पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.
व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी शुक्राणूंची संख्या तसेच त्याची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ब्रोकोली, पालक आणि एवोकॅडो सारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.
संत्री, टोमॅटो तसेच द्राक्षे यांसारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी हे पदार्थ दररोज खा.
सॅल्मन आणि सार्डिनमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड समृद्ध असतात जे शुक्राणूंचे उत्पादन वाढविण्यात मोठ्या प्रमाणात मदत करतात.
अक्रोड आणि काजूमध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि झिंकसह अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात.