रंगांचा सण होळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा होळी २५ मार्च रोजी साजरी होणार आहे. रंगांच्या या सणाला विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. येथे पाहा ८ पारंपारिक पदार्थ जे होळीला आवर्जून बनवले जातात.
गुजिया - होळीला गुजिया नक्कीच बनतात. हे घरी बनवण्यासोबतच बाजारात त्याची व्हरायटीही उपलब्ध आहे.
कांजी वडा - कांजी वडा देखील होळीला बनवला जातो. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये हा अतिशय प्रसिद्ध नाश्ता आहे.
फिरणी - फिरणी ही तांदळाची खीर आहे, ज्यामध्ये दूध, साखर, बदाम आणि काही मसाल्यांमध्ये तासनतास मंद आचेवर शिजवले जाते. फिरणी मातीच्या वाटीत किंवा मडक्यात दिली जाते. होळीला हे आवर्जून बनवली जाते.
पुरणपोळी - पुरणपोळी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थ आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी हमखास बनवली जाते. त्याशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो.
थंडाई - थंड दूध आणि विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स, सीड्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून तयार केलेली थंडाई होळीच्या दिवशी बनवायलाच हवी.
धुसका - धुसका हा एक चविष्ट नाश्ता आहे ज्याला होळीच्या दिवशी जास्त मागणी असते. हे चना मसाला आणि चटणी सोबत सर्व्ह केले जाते.