मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release: ‘शैतान’ ते ‘हीरामंडी’; संपूर्ण आठवडा ओटीटीवर असणार मनोरंजनाचा मेळावा! तुम्ही काय बघणार?

OTT Release: ‘शैतान’ ते ‘हीरामंडी’; संपूर्ण आठवडा ओटीटीवर असणार मनोरंजनाचा मेळावा! तुम्ही काय बघणार?

Apr 29, 2024 09:22 PM IST Harshada Bhirvandekar

OTT Release This Week: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने रिलीज होणाच्या मार्गावर असलेल्या हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

मे महिन्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे. १ मे ते ३ मेपर्यंत ओटीटीवर चांगला कंटेंट येणार आहे. दोन नवीन वेब सीरिज आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स आणि ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने रिलीज होणाच्या मार्गावर असलेल्या हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊया…
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

द ब्रोकन न्यूज २: 'द ब्रोकन न्यूज'चा सीझन २ या आठवड्यात ओटीटीवर धडकणार आहे. विनय वैकुळे दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या तिघांनीही या वेब सीरिजमध्ये पत्रकारांची भूमिका साकारली आहे. 'द ब्रोकन न्यूज सीझन २' ZEE5 वर ३ मे रोजी रिलीज होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

द ग्रेट इंडियन कपिल शो: या सगळ्याशिवाय 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा एपिसोडही ४ मे रोजी रिलीज होणार आहे. यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल धमाल करताना दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हीरामंडी: डायमंड बाजार : 'शैतान' व्यतिरिक्त 'हीरामंडी' देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय फरीदा जलाल, ताहा शाह बदुष्शा, फरदीन खान, अध्यायन सुमन आणि शेखर सुमन हे देखील या वेब सीरिजमध्ये आहेत. ही वेब सीरिज १ मेपासून ओटीटीवर स्ट्रीम होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

शैतान: अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १४९.४९ कोटी रुपये (नेट) आणि जगभरात २११.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा भयपट ३ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

शैतान: अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १४९.४९ कोटी रुपये (नेट) आणि जगभरात २११.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा भयपट ३ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज