'हिरमंडी: द डायमंड बझार' ही सीरिज नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेब सीरिजच्या टीमने यश मोठ्या थाटात साजरे केले. शनिवारी मुंबईत सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल, संजीदा शेख सहभागी झाले होते.
या सीरिजमध्ये काम करणारे कलाकार फरदीन खान, ताहा शाह बदुशा, अध्यायन सुमन, शेखर सुमन यांनी देखील या पार्टीला हजेरी लावली होती.
अभिनेत्री मनीषा कोईरालाने या पार्टीला पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सीरिजमधील मल्लिकाजान ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
सोनाक्षी सिन्हा ग्लॅमरस ब्लॅक ड्रेस परिधान करून पार्टीला पोहोचली होती. तिने हीरामंडी सीरिजमध्ये रेहाना आणि फरीदान जहाँ या दोन भूमिका केल्या आहेत.
रिचा चढ्ढा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. ऋचाने हीरामंडी सीरिजमध्ये मल्लिकाजनची दत्तक मुलगी लाजवंतीची भूमिका केली आहे
अभिनेत्री अदिती राव हैदरीही देखील लाल रंगाचा पोशाख परिधान करून हीरामंडीच्या सक्सेस पार्टीमध्ये आली होती. आदितीने या सीरिजमध्ये मल्लिकाजनच्या मुलीची बिबोजनची भूमिका साकारली आहे.
ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये अभिनेता फरदीन खान स्टायलिश दिसत होता. त्याने हिरामंडीमध्ये वली बिन झायेद अल मोहम्मदची भूमिका साकारली आहे
संजीदा शेख या पार्टीला पिवळ्या आणि गोल्ड कलरच्या कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये आली होती. तिने हिरामंडी सीरिजमध्ये वहिदा म्हणून काम केले आहे.
ताहा शाह बदुशा काळ्या डिझायनर आउटफिटमध्ये दिसत होता. हिरामंडीमध्ये त्याने नवाब ताजदार बलोचची भूमिका वठवली आहे