(1 / 6)संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची वाट बघत आहेत. वेश्यांचं जीवन एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये आजपर्यंतचे सगळे दमदार कलाकार दिसणार आहेत. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी आणि शर्मीन सहगल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अनेक कलाकार या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत, जे वर्षानुवर्षे बेरोजगारासारखे घरीच बसून होते.